पुणे – महापालिकेकडून शहरात 18 मे पासून आठवडयातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, या पाणीबंद नंतर शहरातील काही भागात पुढे दोन ते तीन दिवस पाणी अतिशय कमी दाबाने तसेच कमी येत असल्याने महापालिकेकडून दोन आठवडयांपूर्वी सिंहगड रस्ता आणि कात्रज भागातील पाण्याचे नियोजनात बदल केला होता. त्यानंतर आता खराडी- चंदननगर भागाच्या पाण्याच्या नियोजनात बदल करण्यात आला असून येत्या शनिवार ( दि. 10 ) पासून प्रभाग क्रमांक 4 मध्ये काही भागात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एक दिवसआड पाणीपुरवठा होणारा भाग व वेळ
शुक्रवार, रविवार, मंगळवार
सकाळी 9.3 ते दुपारी 2 : चौधरी वस्ती, सातववस्ती, पंढरीनगर, गुलमोहर, शंकरनगर.
दुपारी 1.30 ते सायंकाळी 6. 30 : चंदननगर, श्रीकृष्ण सोसायटी, हनुमान व्यायाम शाळा, मथुरानगर, संघर्ष चौक, शिवाजी पुतळा, दत्तप्रसाद, चव्हाण नगर, त्रिमूर्ती सोसायटी, प्रीत नगर, समता सोसायटी, म्हाडा सोसायटी, नागपाल रोड.
शनिवार, सोमवार, बुधवार
सकाळी 9.30 ते दुपारी 2 : गणपती सोसायटी, तुकारामनगर, बोराटेवस्ती, झेन्सार, थिटे नगर, पाटील बुवानगर
दुपारी 1.30 ते सायंकाळी 6 : बोराटे वस्ती गल्ली नं. 1 ते 23, शंकरनगर, वृंदावन सोसायटी, राघवेंद्रनगर, यशवंतनगर, तुकराम नगर, सितारा बेकरी, साई पार्क, शेजवल पार्क, साईबाबा मंदिर