पिंपरी, दि. 18 (प्रतिनिधी-श्रीपाद शिंदे) – सोशल मीडियावर अकाउंट नाही अशी व्यक्ती सापडणे आताच्या परिस्थितीत कठीण आहे. काहीजण अनेक अकाउंट्स सुरू करून वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्वतंत्रपणे व्यक्त होत असतो. पण आपल्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट सुरू करून त्याद्वारे आपली बदनामी, आपल्या नावाने इतरांची बदनामी, फसवणूक होत असेल तर त्याचा सगळा रोष आपल्यावर येऊ शकतो. त्यामुळे वेळीच सावध होऊन आपली सोशल मीडिया अकाउंट्स सुरक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे.
बनावट खात्यांद्वारे बदनामीचे अनेक प्रकार शहरात उघडकीस आले आहेत. विशेषत: महिलांचे फोटो मार्फ करुन बदनामी करणे, बनावट खात्यांद्वारे ओळखीच्या लोकांना अश्लील मेसेज केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी सावधानी बाळगणे गरजेचे आहे.
मेसेजिंग आणि कॉलिंगसाठी सोशल मीडियावर पाच हजार पेक्षा अधिक ऍप्स असल्याची शक्यता सायबर तज्ज्ञ व्यक्त करतात. संगणक आधारित शिक्षणाला चालना मिळाल्याने कोडिंग क्लासेसला उधाण आले आहे. प्रोग्रॅमिंगची एखादी भाषा येत असेल तर आपण सहजपणे ऍप्लिकेशन तयार करू शकतो. लहान मुले देखील ऍप्लिकेशन तयार करू लागल्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची संख्या वाढली आहे. याचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतात. फेसबुक, व्हाट्सअप यांसारख्या प्रथितयश सोशल मीडिया साइट्सवर अनेक सायबर गुन्हेगार कुरापती करण्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधत असतात.
फेसबुकवर बनावट अकाउंट सुष करून त्याआधारे संबंधित व्यक्तीच्या नावाने त्याच्या संपर्कातील लोकांना पैसे मागितले जातात. अनेकदा त्या बनावट अकाउंटवरून अकाउंटधारक व्यक्ती आणि त्याच्या संपर्कातील अन्य लोकांची बदनामी देखील केली जाते. फेसबुकवरून पैशांची मागणी, बदनामी अथवा अन्य गैरप्रकार होत असेल तर संबंधित अकाउंटची खालीलप्रमाणे तक्रार करा.
सुरुवातीला ज्यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते बनवले आहे त्यांनी स्वतःच्या फेसबुक खात्यावरून बनावट खाते शोधा.
जर स्वतःला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाइलवरून रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडून सदर बनावट खात्याची लिंक मागवून घ्या.
बनावट खात्यावर गेल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्या डॉट वर क्लिक करा.
तुमच्यासमोर ऋळपव र्डिीीं ीे ठशिीीं झीेषळश्रश हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
झीशींशपवळपस ीें लश डोशेपश हा पहिला पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पुढे तुम्हाला 3 पर्याय दिसतील. चश, अ ऋीळशपव, उशश्रशलीळीूं.आपण आपल्याच बनावट खात्याला रिपोर्ट करत असल्यास त्यापैकी चश हा पर्याय सिलेक्ट करा आणि छशुीं वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या नावे तयार झालेले बनावट खाते काही वेळाने आपोआप बंद होईल.
दुसऱ्याचे बनावट खाते बंद करण्यासाठी चश ऐवजी अ ऋीळशपव सिलेक्ट करा. त्यानंतर छशुीं वर क्लिक केल्यानंतर नाव टाइप करण्यासाठी तुमच्यापुढे एक बॉक्स येईल. त्या बॉक्स मधे तुमच्या ज्या मित्राचे बनावट खाते बनवले आहे त्याचे नाव टाइप करा. त्या ठिकाणी तुमच्या मित्राचे मूळ फेसबूक खाते दिसेल, त्यावर क्लिक करून रिपोर्ट सेंड करा. बनावट खाते काही वेळाने बंद होईल.
सोशल मीडियावर सुरक्षित वावर करण्यासाठी हे करा
सोशल मीडिया अधिकृत ऍप व्यतिरिक्त अन्य ठिकाणी ते सोशल मीडिया अकाउंट वापरत असाल तर आपल्या प्रोफाइल मधून लॉग आऊट करण्यास विसरू नका.
पब्लिक सर्चपासून सोशल मीडियावरील तुमची प्रोफाइल ब्लॉक करा. म्हणजे तुमचे प्रोफाइल कुणी पाहिले पाहिजे हे सुनिश्चित करा. तुमची कोणतीही माहिती सार्वजनिक करू नका.
बॅंक खात्याच्या तपशिलाप्रमाणेच सोशल मीडिया अकाउंटचा तपशील देखील तितकाच महत्वाचा असतो. त्यामुळे प्रोफाइलची यूजरनेम, पासवर्ड आदी माहिती कुणाशीही शेअर करू नका.
अनोळखी व्यक्तींच्या रिक्वेस्ट कधीही स्वीकारू नका. तुमच्या ओळखीतील व्यक्तीची रिक्वेस्ट आली तर खात्री करूनच ती स्वीकारा.
आपली वैयक्तिक माहिती कोणत्याही चुकीच्या व्यक्तीकडे जाणार नाही, याची काळजी घेऊनच सोशल मीडियावर फोटो, स्टेटस शेअर करा.
सोशल मीडियावर घराचा, ऑफिसचा पत्ता, मोबाइल क्रमांक, लोकेशन शेअर करू नका. वैयक्तिक माहिती सर्वांसाठी जाहीर न करण्याचे सेटिंग असते, तिचा वापर करा.
संशयास्पद आणि अनोळखी लिंक्स ओपन करू नका. त्यातून तुमचे अकाउंट हॅक होऊ शकते. तुमची गोपनीय माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती जाऊ शकते.
सोशल मीडियावरील आपल्या अकाउंटची गोपनीयता सेटिंग्ज हाइ लेवलवर किंवा रिस्टिकटेड मोडवर ठेवा.