चिखली, दि. 18 (वार्ताहर) -राज्यात सध्या लम्पी आजाराने थैमान घातले आहे. मावळ, मुळशी परिसरात देखील लम्पी दाखल झाला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील पशुधन सुरक्षित राहण्यासाठी लम्पीचे लसीकरण करण्यात आले. माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी कुदळवाडीतील जनावरांचे लसीकरण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पशुसंवर्धन विभाग व पिंपरी चिंचवड महापालिका पशुवैद्यकीय विभाग यांच्या वतीने कुदळवाडी, चिखली परिसरातील जनावरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
या लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन सर्व कुदळवाडीतील गोवंश व जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. या वेळी सहायक आयुक्त पशसंवर्धन डॉ. शिंदे, पशुधन विकास अधिकारी डॉ. शिरखाने तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, पांडुरंग बालघरे, स्वराज पिंजण, संभाजी बालघरे, सागर बालघरे, राहुल यादव, विशाल बालघरे, राहुल पांचाळ, गणेश यादव, पोपट यादव, प्रकाश चौधरी, ग्रामस्थ उपस्थित होते.