“द फॅमिली मॅन’ ही वेब सिरिज अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. मनोज वाजपेयीचा ऍक्शनपॅक्ड रोल प्रेक्षकांना खूप आवडला. डिजिटल प्लॅटफॉर्मवर मनोज वाजपेयीचे हे पदार्पण आहे. “द फॅमिली मॅन’ चा दुसरा सीझन लवकरच सुरू होतो आहे. यामध्ये आपला रोल कसा असेल, हे सांगण्यास मात्र मनोज वाजपेयीने नकार दिला. प्रेक्षकांची उत्कंठा कायम ठेवण्यास हे आवश्यक असल्याचे त्यांने सांगितले.