मुस्लिम व्यक्तीचा दुसरा विवाह अवैध – गुवाहाटी उच्च न्यायालय

गुवाहाटी – एखाद्या हिंदू स्त्री सोबत मुस्लिम व्यक्तीने दुसरा विवाह केला असल्यास तो कायदेशीररित्या अवैध असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर निकाल देताना आपले मत नोंदविले. यामध्ये न्यायालयाने म्हंटले आहे की, द स्पेशल मॅरेज अॅक्ट, 1954 नुसार अशा प्रकारच्या विवाहाला कायदा मान्यता देत नाही. याप्रकरणावर निकाल देताना न्यायालयाने मागील प्रकरणाचा एक दाखला सुद्धा दिला आहे.

गुवाहाटी उच्च न्यायालयाने हा निकाल देताना मोहम्मद सलीम अली (मृत) विरुद्ध शमसुद्दीन (मृत) या खटल्याचा संदर्भ दिला. मुस्लिम कायद्याप्रमाणे, मूर्ती पूजा करणाऱ्या व्यक्तीसोबत जर मुस्लिम व्यक्तीचा विवाह झाला तर तो विवाह अमान्य असल्याचं या खटल्यात सांगण्यात आलं होतं.त्याचाच संदर्भ या खटल्यात देण्यात आला. तसेच इस्लाम धर्माच्या नियमानुसार, लग्न करणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी इस्लामला मानायला हवं असंही सांगितलं आहे.

आसाममधील सहाबुद्दीन अहमद हे कामरुप जिल्ह्यातील अहमदनगर कार्यालयात नोकरीला होते. 2017 साली एका अपघातात सहाबुद्दीन यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांची दुसरी पत्नी दीपमणी करिता यांनी आपल्याला पेंशन आणि इतर सरकारी लाभ मिळावेत अशा आशयाची एक याचिका दाखल केली होती. कलिका यांना 12 वर्षाचा एक मुलगा आहे.

, “याचिकाकर्त्या कलिता आणि मृत सहाबुद्दीन अहमद यांच्यामध्ये झालेल्या विवाहाची नोंद स्पेशल मॅरेज अॅक्ट नुसार करण्यात आली होती यात काही शंका नाही. त्यावेळी त्यांचे पती जिवंत होते. पण सहाबुद्दीन अहमद यांचा त्यांच्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट होऊन, त्या तारखेनंतर दुसरा विवाह झाल्याचा कोणताही पुरावा याचिकाकर्त्यांकडे नाही.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.