बेलारी – राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या पहिल्या फेरीत महाराष्ट्राचा निखिल दुबे आणि छत्तीसगडचा दिनेश कुमार यांनी आपली विजयी सुरुवात केली आहे. त्यांनी ७५ किलो वजन गटात प्रेक्षणीय विजय मिळविले.निखिलच्या तुफानी आक्रमणापुढे गुजरातचा साजील लिलगार साफ निष्प्रभ झाला आणि पहिल्याच फेरीत पंचांना लढत थांबवावी लागली.
निखिलचा हा विजय त्याची क्षमता सिद्ध करणारा होता. दुसरीकडे दिनेशने बंगालच्या अभिषेक शॉ याचा प्रतिकार मोडन काढताना जज्जेसकडून 3-2 असा कौल मिळविला. याशिवाय अनुभवी सुमित संगवान हा प्रमुख चेहरा राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे आकर्षण असला आजचा दिवस महाराष्ट्रच्या खेळाडूंनी गाजविला.
सुमित संगवाने 86 किलो वजन गटातून आपली आगेकूच सुरू केली. त्याने पहिल्या फेरीत आंध्रच्या हरिष प्रासादुला याचा एकतर्फी लढतीत पराभव केला. नीरज स्वामी (४८ किलो) यानेही अपेक्षित सुरवात करताना हरियानाच्या सागरचा एकतर्फी पराभव केला.आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या निकषांनुसार या स्पर्धेत 13 नव्या गटांचा समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धेतील विजेते खेळाडू थेट आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरतील. जागतिक स्पर्धा सर्बियात बेलग्रेड येथे 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सुवर्ण आणि रौप्यपदक विजेते बॉक्सर राष्ट्रीय शिबिरासाठी पात्र ठरतील. राष्ट्रीय स्पर्धेनंतर 24 सप्टेंबर पर्यंत निवड चाचणी पार पडणार आहे.