चांद्रयान 2 ची कक्षा रूंदावण्याचा दुसरा प्रयोग यशस्वी

बंगलुरू- चांद्रयान 2 ची कक्षा रूंदावण्याचा दुसरा प्रयोग आज मध्य रात्री एक वाजून आठ मिनीटांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी यशस्वीरित्या पार पाडला. यानात बसवण्यात आलेली प्रोप्यलसन सिस्टीम 883 सेकंद प्रज्वलित करण्यात आली. आता हे यान 251 बाय 54829 किमी या कक्षेत कार्यरत आहे. यानाच्या सर्व यंत्रणा यशस्वीरित्या कार्यरत आहेत असेही इस्त्रोने कळवले आहे.

29 जुलै रोजी हे यान तिसऱ्या कक्षेत सोडले जाणार आहे. या यानातील रोव्हरला प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठ भागावर दक्षिण धृवावर सोडले जाणार आहे. हे काम 14 ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. त्या आधी पृथ्वीवरून कमांड देत यानाच्या अन्यही महत्वाचे टप्पे पार पडणे महत्वाचे आहे. ते टप्पे यशस्वीपणे पार पडतील असा इस्त्रोच्या तंत्रज्ञांना विश्‍वास आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.