मोहम्मद आमिर कसोटीतून निवृत्त

File pic

लाहोर – पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने पाकिस्तानकडून 36 कसोटी सामने खेळत 119 विकेट घेतल्या. त्याने अखेरची कसोटी दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळली होती.

वर्ष 2010 मध्ये मॅच फिक्‍सिंगमध्ये सहभागी असल्याकारणाने त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्याने 2016 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. तर, गॉल मैदानावर श्रीलंकेविरोधात त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

निवृत्तीबाबत आमिर म्हणाला की, क्रिकेटच्या सर्वांत मोठ्या प्रकारात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही सन्मानाची गोष्ट आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानकडून खेळणे हेच माझे अखेरचे ध्येय आहे. मी पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 विश्वचषकासह संघासाठी पुढील सर्व सामन्यांसाठी योगदान देण्यासाठी मी आपल्या शरिरावर काम करणार असून आपले सर्वोत्तम देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. निवृत्तीचा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)