मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत असते. लवकरच ती अभिनेता सलमान खानसोबत ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. टायगरच्या 2 भागांना मोठे यश मिळाल्यानंतर चाहते आता या चित्रपटाच्या पुढच्या भागाची देखील आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र सध्या कतरिना एका फोटोमुळे ट्रोल झाली आहे.
कतरिना कैफने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यात तिने निळ्या रंगाचा टी शर्ट परिधान केला आहे. कतरिनाचे हे फोटो पाहून अनेकांनी तिला विकी काैशलच्या नावावरून तिच्यावर टीका केली आहे. ‘कतरिना कैफने विकी काैशलचे शर्ट घातले आहे.’ ‘विकी काैशलच्या शाळेचा गणवेश दिसत आहे. ‘लग्न झाल्यापासून कतरिनाचा खर्च कमी झाला आहे. कारण ती फोटोशूट ही घरीच करत आहे तेही विकी काैशलच्या जुन्या शर्टवर’ अशा कमेन्ट या फोटोवर नेटकरी देत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, कतरिना कैफ आणि विकी काैशल यांनी 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे लग्न केले होते. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह पार पडला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते दोघे हिल स्टेशनला गेले होते. याचे काही फोटोही कतरिनाने सोशल मीडियावर शेअर केले होते.