लोणी काळभोर -शिंदवणे (ता. हवेली) गावच्या हद्दीत पांचाळवस्ती येथे 5 महिन्यांपूर्वी गायरान जमिनीतील खड्ड्यामध्ये आढळून आलेल्या एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह हा खून करुन टाकण्यात आला होता. त्यामुळे अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, महाराष्ट्र राज्य, गणेशखिंड, पुणेचे उपसंचालक यांनी त्याचा खून झाल्याचा अहवाल दिला आहे.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पवन मधुकर चौधरी यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 फेब्रुवारी रोजी सूरज राजेंद्र मोरे (रा. शिंदवणे, पांचाळवस्ती, ता. हवेली) यांनी फोन करून शिंदवणे गावचे हद्दीत पांचाळवस्ती येथे फॉरेस्टच्या माळावरील खड्ड्यामध्ये एका पुरुषाचा मृतदेह पडलेला आहे, अशी माहिती पोलिसांना दिली होती.
एकंदरीत तपासानंतर अभिप्राय 16 जून रोजी लोणी काळभोर पोलिसांना प्राप्त झाला. त्यानंतर अज्ञात व्यक्तींविरोधांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.