मुंबई – ‘दाऊद समर्पित’ आणि ‘दाऊद शरण सरकार’ असा शब्द प्रयोग आज राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार हे केवळ सर्वसामान्य जनता आणि जनसेवेला समर्पित आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी स्पष्ट केले.
तसेच दाऊद समर्पित सरकार म्हणणे, म्हणजे राज्यातील अकरा कोटी जनतेचा अपमान आहे, असेही महेश तपासे म्हणाले.
पुढे तपासे म्हणाले की, यावेळी फडणवीसजी यांना एक आठवण नक्कीच करून द्यावीशी वाटते, की आपण मुख्यमंत्री असताना आपलेच एक मंत्री महोदय दाऊदच्या नातेवाईकांच्या विवाहप्रसंगी उपस्थित होते, यावरही आपण प्रकाश टाकावा.