Today Cricket Live Score, IND vs SA 1st Test 2023 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरू झाला आहे. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्कमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. प्रसीद कृष्णाने भारतासाठी पदार्पण केले आणि डेव्हिड बेडिंगहॅमने दक्षिण आफ्रिकेसाठी नांद्रे बर्जरसह पदार्पण केले. सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
IND vs SA Test Live Score : अय्यरनंतर विराटही परतला माघारी…
दक्षिण आफ्रिकेचा पदार्पणवीर वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर आणि कागिसो रबाडा याने चांगलाच कहर केला आहे. भारतीय संघाचा निम्मा संघ 107 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. अय्यरनंतर कागिसो रबाडाने विराट कोहलीला बाद करून टीम इंडियाला पाचवा धक्का दिला. विराटने 64 चेंडूत 38 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. कोहलीने यष्टिरक्षक काइल वेरेयनकरवी झेलबाद केले. रबाडाचे हे तिसरे यश आहे.
⚪ OH YES
Some ferocious bowling from Rabada to get his 3rd of the innings. Viral Kholi is caught beautifully by Verreynne
🇮🇳 India are 107/5 after 30.6 overs #WozaNawe #BePartOfIt #SAvIND
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 26, 2023
दरम्यान, याआधी उपाहारानंतर भारताला या सामन्यात चौथा धक्का बसला. कागिसो रबाडाने 27व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरला क्लीन बोल्ड केले. अय्यरने 50 चेंडूत 31 धावा केल्या. त्याने विराट कोहलीसोबत चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली.
उपाहारापर्यंत पहिल्या डावात भारताला 3 धक्के..
पहिल्या दिवसाच्या उपाहारापर्यंत भारताने पहिल्या डावात तीन गड्यांच्या मोबदल्यात 91 धावा केल्या होत्या. विराट कोहली 33 आणि श्रेयस अय्यर 31 धावांवर नाबाद होते. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली.
उपाहारापूर्वी भारताला तीन धक्के बसले. यशस्वी जैस्वाल 17 धावा करून, रोहित शर्मा 5 धावा करून आणि शुभमन गिल 2 धावा करून बाद झाले. नांद्रे बर्गरने दोन गडी बाद केले. कागिसो रबाडाला एक यश मिळाले आहे.