खडकवासला : सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाने आजची स्त्री सक्षम व कर्तृत्ववान बनली आहे. स्त्री शिक्षणाने समाजाची प्रगती साध्य झाली. आजच्या पिढीला सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचार समजण्याची गरज असून, आजच्या प्रत्येक युवतीने सावित्रीबाईंची प्रेरणा घेऊन शिक्षणाने आपले ध्येय गाठण्याचे आवाहन भाजप पश्चिम महाराष्ट्राचे सचिव व संघटक दत्तात्रय कोल्हे यांनी केले.
भारतीय शिक्षणात अमुलाग्र क्रांती घडविणाऱ्या व महिलांना शिक्षणाचा हक्क प्राप्त करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कोल्हेवाडी – खडकवासला येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी रवी सोनवणे, दर्शन रायकर, प्रतीक होले, सविता कोंढाळकर, काजल कोल्हे, अजय कोल्हे, अंकित कोल्हे, आशिष कोल्हे, सोहन कोल्हे आदी उपस्थित होते.