मुंबई -उत्तर अंबाझरी मार्गावरील सेवासदन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित सोहोळ्यात अकोला येथील एनकरेज एज्युकेशन या संस्थेला रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या कार्यक्रमात उपस्थित होते.
या दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले, ते म्हणाले,’ भारतीय वंशाची व्यक्ती इंग्लंडची पंतप्रधान झाली. आता भविष्यात इतर देशातही भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होईल. कारण देशाचे नेतृत्त्व नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे. ते झाडांची पानेच नाही तर मुळांना देखील पाणी घालत आहेत. त्यामुळेच वटवृक्ष मोठा होत आहे, अशा शब्दात कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले.