साना, दि. 17 – सौदी अरेबियाने येमेन या देशाच्या उत्तरेकडील अल ज्वाफ या प्रांतातील तीन घरांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यामुळे या प्रांतातील कमीत कमी 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ
जण गंभीर जखमी झाले आहेत.
या हल्ल्यानंतर स्थानिकांनी सांगितले की, हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये लहान मुले आणि महिलांचा अधिक समावेश आहे. या हल्ल्यास सौदी अरेबियाला जबाबदार धरण्यात आले आहे. त्याच बरोबर
नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोपही सौदी अरेबियावर करण्यात आला आहे. यावर सौदी अरेबियाकडून कोणतीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही.