मुंबई – अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी आणि प्रेक्षकांच्या “टेन्शनवरची मात्रा – महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आपल्या विनोदाच्या शैलीने प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करण्यासाठी सज्ज असते. या कार्यक्रमात समीर चौगुले, विशाखा सुभेदार, अरुण कदम, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, गौरव मोरे, ओंकार भोजने इत्यादी कलाकार प्रेक्षकांना नेहमीच हसवत असतात.
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राला पोटधरून हसायला लावणाऱ्या अभिनेता ‘ओंकार भोजने’चा एक व्हिडिओ सध्या सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ओंकार कविता म्हणताना दिसत आहे. छोट्या पडद्यावरुन महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या ओंकाराचा हा व्हिडिओ सत्यजीत यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम आकाउंटवर केला आहे.
View this post on Instagram
ओंकारच्या “तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची” या कवितेची भूरळ सत्यजीत तांबेंनाही पडली असून, त्यांनी हा शेअर करताना ओंकारचं विशेष कौतूक देखील केलं आहे. ओंकारच्या या व्हिडीओला त्यांनी “तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची…कमाल गायलंस मित्रा, ओंकार भोजने !” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर ओंकारच्या चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.