पुणे – उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सतेज करंडक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात बाबुराव चांदेरे पाउंडेशन संघाने तर महिला गटात राजमाता जिजाऊ संघाने विजेतेपद पटकावले. तसेच कबड्डी संघ व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन बाणेर आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेचे पारितोषिक वितरण खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते करण्यात आले.
पुरुषांमध्ये बाबुराव चांदेरे फाउंडेशन संघाने एनटीपीएस संघावर 46- 34 गुणांनी विजय मिळवत सतेज करंडकावर आपला हक्क निश्चित केला. बाबुराव चांदेरे फौडेशनच्या अजित चव्हाण याने आक्रमक खेळ करीत चढाईत 10 गुण मिळविले, राम अडागळे याने पकडीत 7 गुण मिळविले, सुनील दुबिले याने चढाईत 7 गुण मिळविले, अक्षय सूर्यवंशी चढाईत 6 गुण, ऋषिकेश भोजने पकडीत 5 गुण मिळविले. नंदुरबारच्या तेजस काळभोर चढाईत 12 गुण, ऋषिकेश बनकर याने चढाईत 5 गुण मिळविले. श्रेयस उंबरदंड पकडीत 3 गुण मिळविले. ओंकार गाडे विवेक राजगुरू प्रशांत नागरे यांनी प्रत्येकी पकडीत 2 गुण मिळवले.
महिलांमध्ये पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने मुंबईच्या शिवशक्ती संघावर 27-19 गुणांनी विजय मिळवित सतेज करंडकावर आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले. मध्यंतराला दोन्ही संघाचा गुण फलक 8-8 असा समान गुणांवर होता. राजमाता जिजाऊ संघाच्या सलोनी गजमल व अंकिता जगताप यांनी सावध खेळ करत शिवशक्ती संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले. राजमाताच्या सलोनी गजमल हिने आक्रमक चढाई करीत 9 गुण मिळविले. तर अंकिता जगताप हिने चढाईत अष्टपैलू खेळ करीत चढाईत 4 गुण व 5 पकडी करीत 9 गुण मिळविले. कोमल आवळे हिने 2 पकडी केल्या.
पारितोषिक वितरण प्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह व पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष व आयोजक बाबुराव चांदेरे, अविनाश सोलवट, मुध्याधिकारी सचिन भोसले, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, रायगड जिल्हा युवती अध्यक्षा सायली दळवी, बाजार समितीचे संचालक नानासाहेब आबनावे, युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, वासंती बोर्डे, शांताराम जाधव, प्रकाश बालवडकर, राहुल बालवडकर, सागर बालवडकर, पूनम विशाल विधाते, पूजा कड- चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, सरकार्यवाह पंच दत्तात्रय झिंजुर्डे, सतेज संघ बाणेरचे अध्यक्ष अर्जुन शिंदे, स्पर्धेचे आयोजक समीर चांदेरे, किरण चांदेरे, राजेश ढमढेरे, स्पर्धा निरीक्षक सुधाकर घाग, पंच प्रमुख राजेंद्र अनभवने, इम्रान शेख आदी उपस्थित होते.