सातारा (प्रतिनिधी) – नवे जिल्हा पोलीस अधीक्षक अजित कुमार बन्सल यांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. तर मावळत्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना जिल्हा पोलीस दलाने निरोप दिला.
तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बुधवारी सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बदली बदली झाली होती. त्यांना तत्काळ तेथे रुजू होण्याचे शासनाचे आदेश होते. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी नवे जिल्हा पोलीस अधीक्षक अजीतकुमार बन्सल हे साताऱ्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडून सूत्रे हाती घेतली.
अधीक्षक सातपुते यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सातारा जिल्ह्याविषयी बन्सल यांना सातपुते यांनी थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर अधीक्षक सातपुते यांचा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक त्याची सातपुते म्हणाल्या, सातारामध्ये काम करत असताना सर्वच कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे मला चांगले काम करता आले.
सातारकरांनी दिलेले प्रेम आणि जिव्हाळा कधीही न विसरण्यासारखा असून याचा अनुभव मला इतर ठिकाणीही काम करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देईल.