सातारा, (प्रतिनिधी) – येथील ज्ञानविकास मंडळाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. वसंत व्याख्यानमालेचे हे 51 वे वर्ष आहे. ही व्याख्यानमाला बुधवार, दि. 15 ते शनिवार दि. 25 अखेर नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये येथे दररोज संध्याकाळी 6.15 वाजता होणार आहे.
साहित्य, कला, संगीत, इतिहास, अध्यात्म आणि ज्योतिष अशा विविध विषयांना स्पर्श करणारी ही वसंत व्याख्यानमाला सातारकरांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. दि. 15 मे रोजी पुणे येथील प्रा. वंदना बोकील कुलकर्णी यांच्या ‘श्यामची आई-काल, आज आणि उद्या’ या विषयावरील व्याख्यानाने वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे.
गुरुवारी 16 रोजी पुणे येथील हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक स्वप्निल पोरे यांचे ‘हिंदी चित्रपट संगीताचे सुवर्णयुग’, शुक्रवारी 17 रोजी सातार्यातील गायक सुनील कारंजकर आणि ज्योत्स्ना खुटाळे यांचा संगीतकार बप्पी लहरी स्पेशल हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. 18 रोजी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील वृत्त निवेदिका सौ. दीपाली केळकर यांचा ‘दिलखुलास हसवणारी-हास्य संजीवनी’ हा कार्यक्रम होणार आहे.
रविवारी 19 रोजी सातारा येथील प्रसिद्ध वक्ते आणि प्रा. श्रीधर साळुंखे यांचे ‘संतांचे सामाजिक योगदान’ तर सोमवार दि. 20 रोजी पाचोरा येथील प्रसिद्ध वक्ते सचिन देवरे यांचे ‘लाखो लोकांसमोर मी बोलणारच’ या विषयावर व्याख्यान होईल. मंगळवार दि. 21 मे रोजी मुंबई येथील प्रा. मनीषा रावराणे यांचे ‘ज्ञानेश्वरी-अमृतसागर’ तर बुधवार दि. 22 रोजी पुणे येथील प्रसिद्ध ज्योतिषी विश्वास पटवर्धन यांचा ‘स्वभाव राशींचे’ कार्यक्रम होईल.
गुरुवार दि. 23 रोजी पुणे येथील प्रा. अजित आपटे यांचे ‘शिवाजी महाराज आणि मॉडर्न मॅनेजमेंट’ तर शुक्रवार दि. 24 रोजी ज्ञानविकास मंडळाचे कार्याध्यक्ष प्रसाद चाफेकर यांचे ‘स्वामी विवेकानंद-जीवन आणि कार्य’ या विषयावर व्याख्यान होईल.
शनिवार दि. 25 या दिवशी पुणे येथील गीतकार जयंत भिडे यांच्या ‘गदिमांच्या साहित्यातील सौंदर्य स्थळे’ या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. रसिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.