Satara News (कुडाळ,ता. जावळी,प्रतिनिधी) :- कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात तेटली (ता. जावली) गावच्या स्मशानभूमी समोरील जलाशयाच्या नदीपात्रात जोरदार वादळी वारे सुटल्याने तापोळ्याकडून बामणोलीकडे येत असलेली स्पीड बोट पलटी होऊन बुडाली. यामध्ये बोटीत एकूण तीन जण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
बोटीतली एक जण बोटीसह बुडाल्याने बेपत्ता झाला आहे. तर दोघे जण पोहून बाहेर निघाले. ही बोट पुलांचे सर्वेक्षण करणाऱ्या लोकांची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर पुलांच्या कामावरील कर्मचाऱ्यांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.