सातारा – ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारे यांनी केलेले सर्व आरोप उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई फेटाळून लावले आहेत. अंधारे यांनी आपले वक्तव्य 24 तासांत मागे घ्यावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे, असा इशारा देसाई यांनी अंधारे यांना दिला आहे.
सुषमा अंधारे यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. ललित पाटील प्रकरणाशी माझा तिळमात्रही संबंध नाही. त्यामुळे बेजबाबदार वक्तव्य करुन त्या समाजात माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करीत आहेत. कायदेशीर सल्लागाराशी चर्चा करुन कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, दादा भुसे आणि मला बदनाम करण्याचे काम अंधारेंनी तात्काळ थांबवावे असेही मंत्री देसाईंनी स्पष्ट केले.