खंडाळा – शिरवळ (ता. खंडाळा) येथील मुस्लिम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी परवेज काझी यांची तर व्हाइस चेअरमनपदी मुराद पटेल यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.
याप्रसंगी संचालक माजी चेअरमन रफिक खान, संचालक आरिफ सय्यद, आसिफ खान, दिलशाद पठाण, तायरा बागवान, आय्याज पठाण, तबरेज बागवान, मुक्तार काझी, योगेंद्र उर्फ पिंटू गळंगे यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. चेअरमनपदासाठी परवेज काझी यांचा तर व्हाइस चेअरमनपदासाठी पत्रकार मुराद पटेल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाली.
यावेळी नूतन पदाधिकारी परवेज काझी व मुराद पटेल यांचा ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या निवड प्रक्रियेत ज्ञानेश्वर चव्हाण यांना सचिव अमीर भालदार, लिपिक प्रतीक्षा खुडे यांनी सहकार्य केले.