पाचगणी – सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याप्रकरणी जय किशोर जोशी (वय 26, रा. वडाळा, ईस्ट कॅम्प रोड, मुंबई) या पर्यटकावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय जोशी हे काल (दि. 30 नोव्हेंबर) वाई-महाबळेश्वर रस्त्यावर पोस्ट ऑफिससमोर धूम्रपान करताना आढळले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जीवन सर्जेराव मोहिते (वय 32) यांनी फिर्याद दिली असून, हवालदार धुळे तपास करत आहेत.