म्हासुर्णे – चोराडे गावचे युवा उद्योजक श्रीकांत पिसाळ हे सतत उद्यमशील नेतृत्व असून अशाच कार्यकर्त्यांमुळे समाजाला निश्चित दिशा मिळते. त्याचा मातृभूमी दिनदर्शिकेचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मत वर्धन अँग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांनी मांडले,
ते चोराडे (ता.खटाव) येथे मातृभूमी दिनदर्शिकेचे प्रकाशन कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. यावेळी बापूराव पिसाळ, सचिन पिसाळ, महेश घार्गे, पै. तुषार माने, विश्वास माने, राजू माळवे, गोविंद पिसाळ शेठ, बाळासो थोरात, अमोल माळवे, अभिजीत पिसाळ, माजी चेअरमन विजय पिसाळ, रवींद्र घोडके, अरुण घाडगे, प्रमोद शिंदे, संतोष सावंत, भैरवनाथ पतसंस्थेच्या चेअरमन धनश्री साळुंखे, व्हा. चेअरमन सुलोचना पिसाळ, मच्छिंद्रनाथ पिसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
युवा उद्योजक श्रीकांत पिसाळ म्हणाले, या वर्षीच्या दिनदर्शिकेची उपयुक्तता मोठी असून गावातील महत्त्वाचे सण, उत्सव तसेच दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त अशी सर्व माहिती या दिनदर्शिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. ही दिनदर्शिका सर्वसामान्यांसाठी मोफत उपलब्ध आहे,
कार्यक्रमास विलास पिसाळ, चंद्रकांत पिसाळ, प्रशांत पिसाळ, अक्षय घाटगे, सुनिल पिसाळ,संजय चव्हाण,संजय अवघडे, महेश पिसाळ,अभिजित पिसाळ, अण्णासो पिसाळ,अशोक पिसाळ,पांडुरंग पिसाळ,नवनाथ पिसाळ, उमेश पिसाळ, संभाजी कुंभार, आनंदा जाधव, प्रकाश पिसाळ,व चोराडे ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते.