सातारा -उत्साह अन् चैतन्याचे प्रतीक असलेला दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला असून साताऱ्याची बाजारपेठ या सणासाठी सज्ज झाली आहे. बाजारपेठेत विविधरंगी आकाश दिवे पणत्या रांगोळी विजेच्या माळा विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातून खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांमुळे बाजारपेठेला यात्रेचे स्वरूप येत आहे.
यंदा गणेशोत्सव, नवरात्र व दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हाच उत्साह दिवाळी सणातही दिसून येत आहे. पगार बोनस आणि बिशीच्या रकमा हातात पडत असल्याने नागरिकांकडून दिवाळीची जोरदार खरेदी सुरू करण्यात आली आहे. शहरातील पवई नाका खंडाळी राजपद येथील कापड दुकानांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे.
कापड दुकानदारांकडून दिवाळीसाठी विविध सवलती व बक्षिसे जाहीर केली आहेत त्यामुळे नागरिकांचा कपडे खरेदीकडे कल वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत लक्ष्मीपूजनासाठी लागणारी केरसुणी आकाशकंदील पणत्या तसेच किराणा साहित्याची खरेदी वाढली असून ठीक ठिकाणी फटाक्यांची दुकाने ही थाटण्यात आली आहेत. यंदा काही वस्तूंचे दर वाढले असले तरी नागरिकांचा खरेदीतील उत्साह कमी झालेला नाही.
कापड बाजारात गर्दी
दिवाळीच्या सणाची खरेदी आदल्या दिवसांपर्यंत संपतच नाही यात महत्त्वाची खरेदी असते ती कपड्यांची. दिवाळी तोंडावर आली असल्याने साताऱ्याची खण आणि गजबजली आहे. अनेक प्रकारच्या रंगबिरंगी वस्त्रांनी कपड्यांची दुकाने भरून गेली आहेत. पसंतीची कपडे घेण्यासाठी ग्राहकही दुकानांमध्ये गर्दी करू लागले यामुळे कापड बाजारात मोठी उलाढाल होत आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत सातारकरांनी दागिने खरेदीचे नियोजन केले आहे. त्यामुळे साताऱ्यातील सराफ पेडी ही दिवाळीसाठी सज्ज झाली आहे तयार दागिने खरेदी करण्याबरोबरच दागिने घडवून घेण्याकडे नागरिकांचा कोण आहे सध्या सोन्याचा एक तोळ्याचा दर 61हजार तर चांदीचा एक किलोचा दर 71 हजार इतका आहे.
दिवाळीला नवीन वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो यंदा दिवाळी पाडवा व लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत नवीन घरात गृहप्रवेश करण्याचे नियोजनही अनेकांनी केले आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहपयोगी वस्तू आटाचक्की फ्रिज वॉशिंग मशीन टीव्ही इलेक्ट्रिक बाइक अशा वस्तूंचे हे नागरिकांकडून बुकिंग करण्यात आले आहे
================