पोलीस दलातील चमकणारा तारा हरवला : मान्यवरांकडून श्रद्धांजली
वाठार स्टेशन – सोनके, ता. कोरेगाव येथील पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना पुणे या ठिकाणी कार्यरत असलेले अशोक विश्वासराव धुमाळ यांचे काल (दि,२९) रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पोलीस दलाने एक चांगला अधिकारी गमावल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मंगळवारी ( दि,३०) रोजी त्यांच्या मूळ गावी सोनके येथे शासकीय इतमामात करण्यात त्यांचे च्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली.
अशोक धुमाळ हे १९९१ बॅचचे अधिकारी होते. अत्यंत मृदू आणि सुस्वाभावी होते. त्यांचे मूळ गाव सोनके. त्यांनी सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, पौंड, मुळशी या ठिकाणी चांगली कामगिरी केली. नुकतेच पुणे येथे त्यांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्या ठिकाणी काम करत असताना त्यांचा अपघात झाला.
धुमाळ यांना उपचारासाठी भारती विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. निधनाची खबर मिळताच त्यांच्या कुटुंबावर तसेच सोनके गावावर शोककळा पसरली. एक चांगला अधिकारी गमावल्याची खंत गावकऱ्यांना वाटू लागली.
अशोक धुमाळ यांच्या अंत्यसंस्कारासाठी पुण्याचे उप आयुक्त गिल, सातारा पोलीस प्रमुख समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव राजेंद्र शेळके, वाठार स्टेशनचे सपोनि अशोक हुलगे, त्यांच्या बरोबर पोलीस दलात काम केलेले अधिकारी मित्रमंडळी पौड तसेच मुळशी येथून मित्रसमूह तसेच सोनके पंचक्रोशीतील आजी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अनेक गावातील सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ जनसमुदाय उपस्थित होता.
पुणे आणि सातारा पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. भडाग्नी त्यांच्या मोठ्या मुलामार्फत देण्यात आली. यावेळी पुणे पोलिसांच्या वतीने पोलीस उपआयुक्त गिल यांनी श्रद्धांजली वाहिली तर सातारा पोलिसांच्या वतीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी श्रद्धांजली वाहिली. माजी जि प सदस्य प.स.सदस्य तसेच विविध गावच्या सरपंचांनी श्रद्धांजली वाहिली.