जिल्ह्यात आणखी 186 जण पॉझिटिव्ह
सातारा – जिल्ह्यात काल (दि. 6) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, आणखी 186 नागरिक करोना संक्रमित झाले असून, चार बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील रुग्णालये, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेतलेल्या 286 जणांना गुरुवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
बाधितांची तालुकानिहाय संख्या आणि त्यापुढे कंसात आजअखेर बाधितांची एकूण संख्या – कराड 40 (39038), सातारा 37 (51504), माण 28 (17799), फलटण 16 (37113), पाटण 16 (10117), खटाव 14 (25659), कोरेगाव 11 (21853), जावळी 6 (9989), वाई 5 (15703), खंडाळा 4 (14128), महाबळेश्वर 1 (4678) व इतर 8 (2135), असे आजपर्यंत एकूण दोन लाख 49 हजार 716 करोनाबाधित आहेत. गेल्या 24 तासांमध्ये सातारा तालुक्यातील तीन, वाई तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.