Satara CoronaVirus Updates : 1037 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 99 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले असून, 1037 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 75, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 299, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 53, कोरेगाव 25, वाई 109, खंडाळा सहा, रायगाव 100, पानमळेवाडी 195, महाबळेश्वर 50, म्हसवड 41, तरडगाव 29 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 55, असे एकूण 1037 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

करोनाची सद्य स्थिती
एकूण नमुने – 308910
एकूण बाधित – 56052
घरी सोडण्यात आलेले – 53572
मृत्यू – 1811
उपचारार्थ रुग्ण – 699

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.