सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल (मंगळवार, दि. 16) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, नवे 308 करोनाबाधित आढळले असून, गेल्या 24 तासांत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी बुधवारी दिली.
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत एकाच दिवसात दुपटीहून अधिक वाढ झाल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. फलटण तालुक्यात तब्बल 89 नवे बाधित रुग्ण आढळले असून, त्या खालोखाल सातारा तालुक्यात 49, कोरेगाव तालुक्यात 37 तर खंडाळा तालुक्यात 31 जण बाधित झाले आहेत. नागरिकांनी “सवयभान’ जपले नाही, तर प्रशासनाकडून कठोर निर्बंध लागू होऊ शकतात.
सातारा शहरात सदरबझार सात, रविवार पेठ, देशमुख कॉलनी प्रत्येकी तीन, मंगळवार पेठ, पंताचा गोट, गोडोली, शाहूनगर प्रत्येकी दोन, शनिवार पेठ, यादोगोपाळ पेठ, मोळाचा ओढा प्रत्येकी एक, इतरत्र 15, सातारा तालुक्यात कृष्णानगर, नागठाणे, जैतापूर प्रत्येकी दोन, संभाजीनगर, जुनी एमआयडीसी, देगाव फाटा, लिंब प्रत्येकी एक, कराड शहरात सोमवार पेठ, शनिवार पेठ, कार्वे नाका प्रत्येकी एक, इतरत्र दोन, कराड तालुक्यात आटके, मलकापूर, तांबवे प्रत्येकी दोन, गोवारे, कोयना वसाहत, काले, मसूर, पाली, आगाशिवनगर, गोळेश्वर, कोंढवे प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात नेरले, पाटण, खोजावडे प्रत्येकी एक,
फलटण शहरात लक्ष्मीनगर पाच, भडकमकरनगर तीन, मलठण, नारळी बाग, सगुणामातानगर, विद्यानगर प्रत्येकी एक, इतरत्र 11, फलटण तालुक्यात तरडगाव 18, सांगवी 11, कांबळेश्वर पाच, मालेवाडी, कोळकी प्रत्येकी चार, विडणी, निंभोरे प्रत्येकी तीन, पाडेगाव, शिंदेवाडी, निंबळक, सरडे प्रत्येकी दोन, आदर्की बुद्रुक, साखरवाडी, साठे फाटा, आसू, पवारवाडी, तुकोबाचीवाडी, सस्तेवाडी, मठाचीवाडी, गुणवरे,फडतरवाडी प्रत्येकी एक,
खटाव तालुक्यात शिंदेवाडी तीन, पुसेगाव, दरुज प्रत्येकी दोन, बुध, डिस्कळ प्रत्येकी एक, माण तालुक्यात इंजबाव तीन, म्हसवड, पिंगळी प्रत्येकी दोन, पळशी, बनगरवाडी, बिदाल, किरकसाल प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात देऊर दहा, वाठार स्टेशन सहा, कोरेगाव, कुमठे फाटा, पिंपोडे बुद्रुक प्रत्येकी तीन, अनपटवाडी, जरेवाडी, रहिमतपूर प्रत्येकी दोन, पिंपरी, करंजखोप, जळगाव, सातारारोड, शिरढोण, भाकरवाडी प्रत्येकी एक,
खंडाळा तालुक्यातील लोणंद नऊ, शिरवळ, मिरजे प्रत्येकी सहा, खंडाळा पाच, सांगवी दोन, बावडा, अहिरे, घाटदरे प्रत्येकी एक, वाई शहरात सिद्धनाथवाडी चार, रविवार पेठ एक, इतरत्र दोन, वाई तालुक्यात पसरणी चार, जांब दोन, धावडी, वेळे, पाचवड, देगाव, कवठे, मयुरेश्वर, शेंदुरजणे प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर दोन, पाचगणी एक, जावळी तालुक्यात कुडाळ दोन, बामणोली प्रत्येकी एक, इतर 21, बाहेरील जिल्ह्यांमधील सांगली, पुणे प्रत्येकी तीन, असे एकूण 308 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्याचबरोबर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना, मार्डी, ता. माण येथील 73 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी, ता. कराड येथील 75 वर्षीय महिला व घोगाव, ता. कराड येथील 75 वर्षीय महिला, अशा तीन बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 61 हजार 332 झाली आहे, तर करोनाने आतापर्यंत 1877 जणांचे बळी घेतले आहेत.