पुणे – ससून रुग्णालयात अत्यवस्थ बाधितांची संख्या अधिक असल्यामुळे याठिकाणी अतिदक्षता विभाग 24 तास फुल्ल होत आहे. त्यातही ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी वाढत आहे. मात्र, अतिदक्षता विभागात ऑक्सिजनचा पुरवठा कमी-जास्त वेगाने होत असल्याने खबरदारी म्हणून अत्यवस्थ रुग्णांचे ससूनच्या दुसऱ्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्याचा तसेच अत्यवस्थ रुग्ण वगळता अन्य रुग्णांना प्रवेश न देण्याचा प्रशासनाने निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
ससून रुग्णालयातील नवीन इमारतीमध्ये करोनासाठी साधारण 546 बेड्स आहेत. त्यामध्ये जवळपास 120 बेड्स आयुसीयुचे आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा पुरवठ्याची मागणी वाढू लागली. यातून अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यात काही अडचणी आल्या.
त्यामुळे ऑक्सिजनच्या प्लांटमध्ये काही बदल करावे लागणार असून याचे नियोजन ससून रुग्णालय प्रशासन करीत आहे. याच करणातून नव्याने येणाऱ्या रुग्णांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी अत्यवस्थ रुग्णांना उपचार नाकारले जाणार नसल्याचेही प्रशासनो म्हटले आहे.
ससून इमारतीतील पहिला मजला आम्ही कार्यान्वित केला आहे. त्याचे काम पूर्ण झाले असून सर्व बेड्ला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होतो आहे ना? याची तपासणी करणार आहे. त्यानंतर उद्यापासून पुढील तीन दिवसांत नव्या इमारतीतील 100 रुग्ण पहिल्या टप्प्यात स्थलांतरीत करणार आहोत. रुग्णांना स्थलांतर आवारातच करायचे असले तरी धोक्याचे असल्याने रुग्णवाहिकेतून स्थलांतर करणार आहोत
– एस. चोक्कलिंगम, ससून रुग्णालय प्रशासनाचे अधिकारी