मुंबई – लॉकडाऊन उठविल्यानंतर चित्रपटगृहे खुली करण्यास परवानगी दिल्यानंतर अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहेत. त्यातच डिजिटल प्लॅटफॉर्मवरील चाहत्यांचीही संख्या प्रचंड वाढली आहे. अनेक बहुप्रतीक्षित चित्रपटचे थिएटरमध्ये रिलीज होणार असताना अभिनेता अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंह स्टारर “सरदार का ग्रॅडसन’ डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.
मात्र, या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. हा चित्रपट क्रॉस बॉर्डर लव स्टोरीवर आधारित आहे. यात अर्जुनशिवाय नीना गुप्ता, अदिती राव हैदर आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे काही शूटिंग करोनाच्या काळात पूर्ण करण्यात आले होते.
अर्जुनने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट जारी करत हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असल्याची माहिती दिली आहे. त्याने इंस्टा पोस्टमध्ये लिहिले की, हा चित्रपट आपल्या पेरेंट्स आणि ग्रॅंड पेरेंट्ससह पाहावा. “सरदार का ग्रॅंडसन’ लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अर्जुन लवकरच “संदीप आणि पिंकी फरार’मध्येही झळकणार आहे. याशिवाय तो कॉमेडी हॉरर “भूत पोलीस’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. दुसरीकडे रकुल ही “मेडे’मध्ये अजय देवगणसोबत झळकणार आहे. याशिवाय ती “डॉक्टर जी’मध्ये काम करत आहे.