मुंबई – क्रिकेटर शुभमन गिल सध्या चांगलाच चर्चेत आहे. शुभमनच्या धडाकेबाज डबल सेंचुरीमुळे भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला. यानंतर आक्रमक बॅटिंगसाठी गिलचे सर्वांनी कौतुक केले. सोशल मीडियावर तर गिलच्या मिम्सचा अक्षरशः पूर आल्याचे पाहायला मिळाले. अगदी वीरेंद्र सेहवागने देखील ‘गिल है के मानता नही’ अशा आशयाचे मिम्स शेअर करत शुभमनचे कौतुक केल्याचे दिसून आले. याचवेळी शुभमनचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. ज्यामध्ये फॅन्स शुभमनला थेट मैदानावरच डिवचताना दिसत आहेत.
मॅचदरम्यान शुभमन बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करत असताना फॅन्स जोर जोरात सारा… सारा नावाने ओरडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हैद्राबाद येथे पार पडलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातील हा व्हिडीओ असल्याचा देखील दावा अनेकांनी सोशल मीडियावर केला आहे. फॅन्सने थेट सारा.. सारा ओरडण्याचा अर्थ शुभमनच्या खाजगी आयुष्याबाबत आहे त्याबाबत काही वेगळं सांगण्याची गरज देखील नाही.
काही दिवसांपूर्वी शुभमन सारा तेंडुलकरला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर त्याचे नाव सारा अली खानसोबत देखील नेटकऱ्यांनी जोडले होते. अशात अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केल्याने मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. काहींनी तर थेट कमेंट करत सारा तेंडुलकर कि सारा अली खान ? असा सवाल देखील यावेळी विचारला आहे.
Shubman Gill waves after fans chant ‘Sara-Sara’.
Sara Tendulkar or Sara Ali Khan? 🤔😜🤫#SaraAliKhan #SaraTendulkar #ShubmanGill #INDvsNZ pic.twitter.com/QyHKKvFph2
— Smriti Sharma (@SmritiSharma_) January 18, 2023
शुभनमच्या नावे नवा रेकॉर्ड
शुभनम गिलने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अनेक भीमपराक्रम आपल्या नावे केले. गिल द्विशतक झळकावणारा जगातील आठवा फलंदाज ठरला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गिल हा सर्वात तरुण फलंदाज ठरला. वयाच्या 23 व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम ईशान किशनच्या नावावर होता, ज्याने 24 व्या वर्षी बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले होते. शुभमनने 149 चेंडूचा सामना करत 19 चौकार आणि 9 षटकार लगावले. गिल भारताकडून वनडेत द्विशतक झळकावणारा पाचवा फलंदाज ठरला. गिलच्या वनडेमध्ये हजार धावा देखील पूर्ण झाल्या. त्याने हा विक्रम 19व्या डावात पूर्ण केला. सर्वांत कमी डावात हजार धावा पूर्ण करणारा गिल जगातील दुसरा फलंदाज ठरला.