बॉलीवूडमध्ये एस. एस. राजामौली यांच्या “बाहुबली’ या चित्रपटांला घवघवीय यश मिळाले होते. त्यानंतर आता राजामौली यांचा आगामी “आरआरआर’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटातील स्टारकास्टबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. यासाठी राजामौली यांनी हैद्राबाद येथे एका पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा केली होती.
यावेळी टॉलिवूड सुपरस्टार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर देखील उपस्थित होते. या दरम्यान राजामौलींनी चित्रपटामध्ये राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भट्टसह अभिनेता अजय देवगनही झळकणार असल्याची घोषणा केली.
अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर “आरआरआर’ चित्रपटात स्वातंत्र सैनिकांची भुमिका साकारणार असून आलिया भट्ट आणि अजय देवगन सहाय्यक कलाकार असणार आहेत. चित्रपटात महत्वाची भुमिका साकारण्यास अजय देवगनने होकार दिला आहे. या चित्रपटाचा भाग होण्यासाठी तो खूप उत्साहित असल्याचे राजामौली यांनी ट्विट केले आहे.
गेल्या वर्षभरात सुपरहिट चित्रपट देणार अजय देवगन एस.एस. राजामौलीच्या RRR या चित्रपटात दिसणार आहे. फिल्मफे्अरच्या बातमीनुसार अजयनं या चित्रपटात काम करण्यासाठी मानधन न घेण्याचं ठरवलं आहे. राजामौलींसोबत अजयनची घनिष्ठ मैत्री आहे या मैत्रीसाठीच अजयनं मानधन घेण्यास नकार दिल्याचं समजत आहे.