मुंबई – अभिनेत्री सारा अली खानबद्दल हे प्रसिद्ध आहे की ती अनेकदा सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो शेअर करते आणि हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरते. मात्र काहीवेळी तिला या फोटोमुळे ट्रोल केले जाते. नुकतीच साराने सोशल मीडियावर फोटो शेअर केले. या फोटोमध्ये ती मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेली होती. तिने भस्म आरतीला हजेरी लावली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून चाहतेही तिच्या साधेपणाचे चाहते झाले आहेत.
सध्या सारा तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात विकी कौशलही मुख्य भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट 2 जून 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये सारा अली खान मंदिरात हात जोडून उभी असल्याचे दिसत आहे. साराचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये ती भस्म आरतीमध्ये सहभागी होताना दिसत आहे आणि भक्तीत मग्न आहे. त्यांनी गर्भगृहात जल आणि दुधाने अभिषेकही केला.