हरियाणा म्युझिक इंडस्ट्रीची डान्सिंग क्वीन कोण असे विचारले तर चटकन सपना चौधरीचे नाव घेतले जाते. काही वर्षांपूर्वी हे नाव या इंडस्ट्रीच्या बाहेर फारसे कोणाला ठाऊक नव्हते.
View this post on Instagram
मात्र, आता सपना भारताच्या प्रत्येक शहरांत पोहोचली आहे. स्टेज शो करणाऱ्या या कलाकाराचा प्रवास आता छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत झाला आहे.
View this post on Instagram
पूर्वी तिचे गाणे म्हटले की ती टिपीकल हरियाणवी पोषाखात दिसायची. मात्र आता तिचे स्लेट भरती नावाचे नवे गाणे आले आहे. यात ती चक्क साडीत दिसते आहे व या अवतारातही लोक तिला पसंत करत आहेत. कारण त्याचा टीझर रिलीज झाल्यापासून लाखो लोकांनी हे गाणे पाहिले आहे. या गाण्यात तिच्यासोबत आणखी एक हरियाणवी कलाकार दिसून येतो आहे.