आपल्या डान्ससाठी प्रसिद्ध असलेली देशी क्विन सपना चौधरीची पोस्ट सोशल मीडियावर खपूच व्हायरल होत आहे. सपना चौधरीने आपल्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, तिने अभिनेता हृतिक रोशनच्या सिग्नेचर डान्स स्टेप केल्या आहेत.
हृतिक रोशनच्या “कहो ना प्यार है’ चित्रपटातील “एक पल का जीना…’ या गाण्यावर केलेल्या डान्स स्टेपने प्रेक्षकांची खूपच वाह, वाह मिळविली होती. या डान्स स्टेप्स्ला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. आता सपना चौधरीने हृतिक रोशनचा हा डान्स कॉपी केला आहे. सपनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “बरसात के मौसम में… लेट्स डान्स…’
सपना चौधरीचे चाहते तिच्या या मजेशीर शैलीचा मनसोक्त आनंद घेत आहेत. या पोस्टला 1 लाख 23 हजारांहून अधिक जणांनी लाइकस् केले असून शेकडो कमेंट केल्या आहेत. सध्या सपना चौधरी सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो आणि डान्स व्हिडिओ शेअर कर असते. इंस्टाग्रामवर तिचे तब्बल 2.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.