मुंबई : मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यांवरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रागांत असल्याचे पाहायला मिळत आहे. आयएनएस विक्रांत आर्थिक आणि शौचालय घोटाळा प्रकरणी क्लीन चिट मिळाल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना जाहीर आव्हान दिलं आहे.
सोमैयांना क्लीन #Clean_Cheat कोणी दिली?
संजय राऊतांनी 15 फेब्रुवारी पत्रकार परिषद घेऊन PMC Bank घोटाळ्याचे आरोप केले
28 फेब्र. ठाकरे सरकारनी क्लीन चीट दिलीराऊतांनी रु 100 कोटी शौचालय घोटाळ्याचे आरोप केले
पण राऊतांचे व्याही ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीच क्लीन चीट दिल pic.twitter.com/k8SQ9UHxa9— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 18, 2022
अशातच किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी कागदपत्रं दाखवली असून अशी विचारणा केली आहे की,’क्लीन चिटबद्दल ऐकलं तर संजय राऊतांच्या घरात भूकंप येईल. सोमय्या कुटुंबाने१०० कोटींचा टॉयलेट घोटाळा करत घाण केल्याचं ते म्हणत होते. पण महाराष्ट्राच्या राजकारणाची घाण कोणी केली?” तसेच संजय राऊतांनी केलेल्या आरोपांचा व्हिडीओही दाखवला आहे.