मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संजय खापरे हा विनोदी आणि गंभीर भूमिकाही तितक्याच सहजतेने साकारतो. संजयने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप सोडलेली आहे. अभिनेता संजय हा लवकरच “स्टोरी ऑफ लागीरं’ या चित्रपटात झळकणार आहे. यात तो पोलिसाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
“स्टोरी ऑफ लागीरं’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट एका गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारा असून चित्रपटाच्या केंद्रस्थानी प्रेमकथा, राजकारण असल्याचे दिसून येते. यात रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे, मोहन जाधव, सोमनाथ येलनुरे यांच्यासह संजय खापरे, मिलिंद दास्ताने, प्रेमाकिरण असे अनुभवी कलाकाराची फौज आहे.
यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे हे नव्या दमाच्या कलाकारांचे पदार्पण होत आहे.