मुंबई: संजय देवतळे यांनी आज भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करत हातात शिवबंधन बांधले. देवतळे यांना विदर्भातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली.
संजय देवतळे हे सलग चारदा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार होते. त्यांनी मंत्रिपद देखील भूषविले आहे. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता वरोरा मतदारसंघ युती झाल्यामुळे शिवसेनेकडे आला त्यामुळे त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.