अभिनेता संग्रामचा ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटातील लूक प्रदर्शित

मुंबई – मराठीतील अनेक मालिका आणि विविध नाटकांमधून अभिनेता संग्राम समेळ आपल्याला दिसून आला आहे, आता लवकरच तो ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो एका हॅकरच्या भूमिकेत दिसणार आहे. संग्रामने त्याचे हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

दरम्यान, त्याच्या भूमिकेचा लूक रिव्हील करणारे एक पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे. या पोस्टरवर एक कॅप्शन लिहिण्यात आली असून त्याच्यावर ‘मैत्रीसाठी जीव देणे किंवा घेणे सारखेच असते’ अस लिहिण्यात आले आहे. या ओऴींमुळे त्याची भूमिका नेमकी कोणत्या प्रकाराची आहे त्याच पात्र नेमक कस असणार आहे याबद्दल उत्सुकता कायम आहे. मात्र, चित्रपटातील सस्पेन्स आणि थ्रिल याला एक वेगळा ट्विस्ट देणार असल्याचे हे पोस्टर पाहून तरी नक्कीच वाटतय.

विकी वेलिंगकर या सिनेमाचं दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले असून या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.