नवी दिल्ली – पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावरून आज भारतात परतले आहेत. रियाधमध्ये भविष्यातील गुंतवणुकीवरील पुढाकारासाठी झालेल्या परिषदेमध्ये त्यांनी मंगळवारी भाषण केले. यासोबतच त्यांनी सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सुलतान यांच्यासोबत चर्चा केली.
Prime Minister Narendra Modi arrives in Delhi, after concluding his two-day visit to Saudi Arabia. pic.twitter.com/a2jd5h8YEA
— ANI (@ANI) October 30, 2019
या चर्चेमध्ये नरेंद्र मोदींनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करत, संरक्षणसंबंधी दोन्ही देशांमध्ये (भारत आणि सौदी) असलेल्या सामंजस्याची प्रशंसा केली. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण उद्योगातील सहयोग, अक्षय उर्जा, सुरक्षा सहकार्य आणि नागरी उड्डाण यांसह एकूण बारा सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सामरिक भागीदारीत अधिक गतिशीलता आणि खोली जोडण्यासंबंधी नरेंद्र मोदी आणि सलमान बिन अब्दुल अजीज यांच्यात ‘फलदायी चर्चा’ झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.