‘या’ तीन बँकांवर आरबीआयची कारवाई

नवी दिल्ली – पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आणखी तीन बँकांवर कारवाई केली आहे. यामध्ये पुण्यातील जनता सहकारी बँक, जळगाव पिपल्स सहकारी बँक आणि बंधन बँकेवर आरबीआयकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे जनता सहकारी बँक व जळगाव पिपल्स सहकारी बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जनता बँकेला एक कोटींचा तर पिपल्स सहकारी बँकेला २५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच ऑगस्ट २०१५ पासून पूर्ण क्षमतेने कामकाजाला सुरुवात करणाऱ्या बंधन बँकेने प्रवर्तक हिस्सेदारी 40 टक्क्यांवर न आणल्याने आरबीआयने एक कोटीचा दंड ठोठावला आहे.

1 Comment
  1. CA Shivkumar Malu says

    या बेकाचे audit होते.दुरदेवाने आडीटर नेमणेचे अधिकारच बेकेस दिले आहेत जे चुकीचे व घातक आहे.जर तपासणीसच आपले मरजीनुसार नेमणूक होत असेल, तर independence कसे राहील,आणि ते राहणार नसेल तर अनकुश राहणार नाही.शासनाने आर बी आय ने पृथम तातडीने हे पहावे असे वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.