दक्षिण चित्रपट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू नुकतीच तिच्या आगामी वेब सीरिज सिटाडेलच्या शूटिंगसाठी सर्बियातील बेलग्रेड शहरात पोहोचली. जिथून समंथाने तिच्या बेलग्रेड सहलीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सिटाडेल या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान समंथा सर्बियामध्ये एन्जॉय करत आहे. सामंथा रुथ प्रभूचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल झाले. अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने बेलग्रेड, सर्बिया येथून फोटो शेअर केले आहे. शूटिंगनंतर फ्री टाइममध्ये ती एन्जॉय करताना दिसली. यातील एक फोटोमध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभू एका मांजरीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसली. तिच्या या फोटोने चाहत्यांची मने जिंकली.
या फोटोमध्ये साउथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सर्बियाच्या रस्त्यावर फिरताना दिसली. अभिनेत्री सामंथासोबत तिच्या सिटाडेल वेबसिरीजचे निर्माता-दिग्दर्शक राज आणि डीके यांच्यासोबत होती. या वेब सिरीजच्या दिग्दर्शक जोडी फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रिपमध्ये समंथा तिच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसली.