कलेढोण – कलेढोण, ता. खटाव येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाच्या समाज भूषण हणमंतराव साळुंखे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती या प्रयोगाला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला.
या उपकरणाची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. हे उपकरण आर्यन नितीन यादव व आदर्श सोमनाथ पवार या विद्यार्थ्यांनी तयार केले होते. या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक भोसले व तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एन. पवार व सचिव मिलिंद साळुंखे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. सानप, पर्यवेक्षक पी. एस. लावंड, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.