नगर -करोना विषाणूचा सर्वात जास्त धोका सलून व्यावसायिकांना आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना सर्वात जास्त काळजीही घ्यावी लागेल. क्वचितप्रसंगी ग्राहकांच्या रोषालाही बळी पडावे लागेल. मात्र, प्रत्येक ग्राहक सॅनिटायझर केल्याखेरीज करूच नये, अशी भूमिका नाभिक समाज महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे सलून व्यावसायिकांना सॅनिटरी नॅपकीन्स, हॅंडवॉश आदी सुरक्षा कीटचे काल वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष राऊत, प्रदेश कार्यकारीणी सदस्य विकास मदने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील जाधव यांच्यावतीने वाडेगव्हाण, नारायण गव्हाण येथील नाभिक समाज बांधवांना हे कीट वाटण्यात आले. करोना विषाणूपासून सलून व्यावसायिकांना प्रथम स्वत:चाच बचाव करावा लागेल. व्यावसाय करताना हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सलून व्यावसायिकांना सॅनिटरी नॅपकिन व हॅंडवॉश सारखे सुरक्षा किट वाटपासासाठी केवळ सामाजिक भावनेतून पुढाकार घेतला, अशी भूमिका जिल्हा उपाध्यक्ष जाधव यांनी मांडली.