बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानची भाची अलीजेह अग्निहोत्री सध्या खूप चर्चेत आहे. अलीझेह ही सलमानची बहीण अलविरा आणि मेहुणा अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. अलीझेह लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. अलिझेह अग्निहोत्री ऑस्कर विजेत्या ‘कोडा’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, CODA हा फ्रेंच-बेल्जियन चित्रपट La Famille Belier चा रिमेक आहे. जो १७ वर्षांच्या मुलीच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात त्या 17 वर्षाच्या मुलीला गायिका बनायचे आहे. पण त्या मुलीचे संपूर्ण कुटुंब ऐकू शकत नाही, फक्त तिलाच ऐकू येते. असे म्हटले जात आहे की CODA आणि La Famille Belier या चित्रपटांमध्ये असे कलाकार होते ज्यांना ऐकण्यात अडचण येते.
अलीजेह राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माता दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन विकास बहल करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकास बहलने स्क्रिप्टवर काम पूर्ण केले आहे आणि अलीजेहचे वडील अतुल अग्निहोत्री रिलायन्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नसून त्यावर काम सुरू झाले आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.