मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. मागील काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाबाबत जोरदार चर्चा सुरु होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया आणि राहुल मागील बऱ्याच काळापासून रिलेशनमध्ये होते. त्यानंतर आता दोघांनीही लग्नगाठ बांधली आहे.
सुनिल शेट्टी यांच्या खंडाळा येथील बंगल्यावर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला क्रीडा आणि चित्रपट जगतातील अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली होती. दरम्यान, आता या लग्न सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत.
अथिया शेट्टीने तिच्या इंस्टाग्रामवर हळदी समारंभाचे न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या खूप व्हायरल होत असून, दोघांच्या सुंदर फोटोंवर चाहते प्रेम व्यक्त करत आहेत. त्यांच्या समारंभात अथिया राहुलने अतिशय रोमँटिक पद्धतीने एकमेकांना हळद लावली.
हे चित्र पाहून तुम्ही कल्पना करू शकता की हे कार्य किती मोठ्या पद्धतीने पार पडले असेल. दरम्यान, हळदी समारंभामध्ये अथिया शेट्टी पीच रंगाच्या एम्ब्रॉयडरी सूटमध्ये कमालीची सुंदर होती. त्यांच्या लग्नाची चमक त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. स्वतः अथिया आणि केएल राहुल यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.