मुंबई – बॉलीवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानच्या ‘दबंग टूर’चे कोलकातामध्ये आयोजन करण्यात आले आहे. यामाध्यमातून सलमान खान विविध ठिकाणी कार्यक्रम घेत चाहत्यांचे मनोरंजन करतो. मात्र आता पुन्हा एकदा ‘दबंग टूर’चे आयोजन केल्याने चाहतेही आनंदी झाले आहेत.
उद्या 13 मे रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ईस्ट बंगाल क्लबमध्ये ‘दबंग टूर’ कॉन्सर्ट सोहळा रंगणार आहे. यापूर्वीच्या ‘दबंग टूर’चे आयोजन दुबईमध्ये करण्यात आले होते. त्यानंतर सलमान खानला जीवे मारण्याच्या मिळत असलेल्या धमक्यांमुळे ही टूर पुढे ढकलली होती. मात्र आता पुन्हा हा कार्यक्रम सुरू झाला आहे.
किती असणार ‘दबंग टूर’चे तिकीट ?
सलमानच्या या टूरमध्ये सहभागी होण्यासाठी तिकीट काढावे लागणार आहे. 699 ते 3 लाख रुपयांपर्यंतची तिकिटे उपलब्ध आहेत. साध्या तिकिटांचे दर 699 रुपयांपासून ते 40 हजारांपर्यंत आहेत. तर व्हीआयपी लाउंज प्रवेशासाठी 2 लाख ते 3 लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
बॉलीवूड कलाकार होणार सहभागी
या ‘दबंग टूर’मध्ये दिग्दर्शक प्रभू देवा, गायक गुरु रंधावा, अभिनेता आयुष शर्मा, मनीष पॉल, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस यांसारखे अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे सलमान खान दबंग टूरदरम्यान
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणर असल्याचे म्हंटले जात आहे. शो संपल्यानंतर सलमान ममता बॅनर्जींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहे.