नवी दिल्ली – इलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडण्याची घोषणा केली. ट्विटरच्या नवीन सीईओची घोषणा करताना नाव न घेता ते म्हणाले की, ती 6 आठवड्यात काम सुरू करेल. मस्क आता ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहतील.
Excited to announce that I’ve hired a new CEO for X/Twitter. She will be starting in ~6 weeks!
My role will transition to being exec chair & CTO, overseeing product, software & sysops.
— Elon Musk (@elonmusk) May 11, 2023
ट्विटरच्या नवीन सीईओ एक महिला असेल
आपल्या पायउतार होण्याच्या निर्णयाबद्दल माहिती देताना, ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांना ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सापडले आहे. त्यांनी त्या व्यक्तीचे नाव घेतले नसले तरी ट्विटरच्या नवीन सीईओ महिला असतील असे संकेत त्यांनी दिले. येथे, वॉल स्ट्रीट जर्नलने अहवाल दिले की एलोन मस्क यांनी या पदासाठी कॉमकास्ट एनबीसी युनिव्हर्सल कार्यकारी लिंडा याकारिनो यांच्याशी चर्चा केली आहे.
मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,”मी X/Twitter साठी नवीन CEO नियुक्त केले, हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे. ती 6 आठवड्यांत काम सुरू करेल. मस्क म्हणाले की, ते येत्या काही आठवड्यांत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकाऱ्याची भूमिका स्वीकारतील. यानंतर ते ट्विटरचे सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीम चालवणार असल्याचे त्यांनी सांगितले.”