मुंबई – सुपरस्टार सलमान खानच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्याची प्रसिद्ध फ्रेंचाइजी ‘टायगर 1 आणि 2’ रिलीज झाली आहे. चाहते या मालिकेतील तिसऱ्या चित्रपट ‘टायगर 3’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच सलमानचा बहुचर्चित ‘किसा का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. दरम्यान, अश्यातच सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच कारण देखील तितकंच खास आहे.
नुकतंच अभिनेता सलमान खान याने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला असून, सध्या हा फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. वर्कआउट केल्यानंतरचा फोटो सलमानने शेअर केला आहे. या फोटोत तरुणांनाही लाजावेल अशी त्याची बॉडी आणि फिटनेस दिसत आहे. तसंच सलमानची फिटनेसच्या बाबतीत कोणाशीही तुलना करू शकत नाही. हे आता पुन्हा एकदा या फोटोतून सिद्ध झालं आहे.
या फोटोत अभिनेता कमालीचा फिट असल्याचं दिसत आहे. सलमानचे फॅन्स देखील त्याच कौतुक करताना दिसत आहे. या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे. अभिनेता सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्याचे ‘किसी का भाई किसी की जान’ नंतर सलमान खान ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे जो यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधला चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट यावर्षी 10 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.